देशात गेल्या २४ तासांत ५७,११७ नवे रूग्ण; ७६४ जणांचा मृत्यू

गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५७ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७६४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Single day spike of 57,117 positive cases & 764 deaths in India in the last 24 hours

देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५७ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७६४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३६ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ झाली आहे. तर सध्या ५ लाख ६५ हजार १०३ active रूग्ण आहेत. तसेच १० लाख ९४ हजार ३७४ कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जुलै महिन्यात ११ लाख रुग्णांची नोंद

भारतात जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्याच्या अखेरिस देशात कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांच्या वर होती. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील १.६ टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही ११ हजार ९८८ इतकी होती. जुलै महिन्यात कोरोनाने इतका वेग पकडला की अखेरच्या १५ दिवसांमध्ये तब्बल ७.३ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, केवळ जुलै महिन्यात भारतात ११.१ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १९ हजार १२२ जणांनाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – कोरोनाचा उद्रेक; देशात जुलै महिन्यात ११ लाख रुग्णांची नोंद