Corona Update: देशात कोरोनाचा कहर, २४ तासांत सर्वाधिक रुग्ण मृत्युमुखी!

Single-day spike of 62,064 cases and 1,007 deaths reported in India, in the last 24 hours

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात ६० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. दरम्यान देशात २४ तासांत सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार ६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सर्वाधिक १ हजार ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख १५ हजार ७५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४४ हजार ३८६ रुग्णांचा मृत्यू झाला असून १५ लाख ३५ हजार ७४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच देशात सध्या ६ लाख ३४ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान देशात ९ ऑगस्टपर्यंत २ कोटी ४५ लाख ८३ हजार ५५८ नमुन्यांंच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ४ लाख ७७ हजार २३ नमुन्यांच्या चाचण्या रविवारी झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research (ICMR))ने दिली आहे.

देशात सर्वाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून येथील कोरोनाबाधितांच्या संख्येने ५ लाखांच्या टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १७ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण तामिळनाडून, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळले आहे. दरम्यान जगातील देखील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी पुढे गेली आहे.


हेही वाचा – अमित शाह ‘कोरोनामुक्त की कोरोनाग्रस्त’ संभ्रम कायम