घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटलॉकडाऊनमध्ये शोधा सेक्स पार्टनर, सरकारनेच दिला सल्ला!

लॉकडाऊनमध्ये शोधा सेक्स पार्टनर, सरकारनेच दिला सल्ला!

Subscribe

लॉकडाऊनचा लोकांच्या मानसिक आरोग्यवर विपरीत परिणाम होत आहे. लोकांचा स्ट्रेस वाढतो आहे.

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतासह अनेक देशात लॉकडाऊन सुरू आहे. आता भारतात लॉकडाऊनचा ४ था टप्पा सुरू आहे. ३१ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. पण आता लॉकडाऊन सुरू होईन जवळपास दोन महिने उलटले. त्यामुळे या लॉकडाऊनचा लोकांच्या मानसिक आरोग्यवर विपरीत परिणाम होत आहे. लोकांचा स्ट्रेस वाढतो आहे. नेदरलॅंडमध्ये तर सरकारने लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे.

नेदरलँडमध्ये लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना सेक्स पार्टनर शोधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.मानसिक आरोग्य राखण्यासाठी भारतातील लोकं घरात व्यायाम, योगा करत आहेत, आवडीचे छंद जोपासत आहेत. तर दुसरीकडे काही देशांमध्ये मात्र अजब सल्ले दिले जात आहे.

- Advertisement -

बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार, नेदरलँण्डमध्ये सरकारने नवीन गाइटलाइन्स जारी केल्या आहेत. एकटेपणा दूर करण्यासाठी व्यक्तीला सोबतीला दुसरी व्यक्ती शोधू शकते. जर दोघांपैकी एकामध्येही कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत, तर त्यांनी सेक्स करू नये. असंही स्पष्ट केलं आहे. तुम्ही जितक्या जास्त व्यक्तींना भेटाल तितका व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो. या एकाच व्यक्तीला नेहमी भेटा, जेणेकरून तुम्ही आजारापासून दूर राहाल असं या गाइडलाइनमध्ये म्हटलं आहे.

नेदरलँडमध्ये 23 मार्चपासून लॉकडाऊन आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत इथला लॉकडाऊन तितका कडक नाही. याआधी न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाने असा सल्ला दिला होता. लॉकडाऊनमुळे लोकांमधील वाढता स्ट्रेस कमी करण्यासाठी  विशेष गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये लोकांच्या सेक्स लाइफवर विशेष लक्ष देण्यात आलं होतं. न्यूयॉर्क पोस्टने याबाबत वृत्त दिलं होतं. स्ट्रेस दूर करण्यासाठी सुरक्षित सेक्स आणि हस्तमैथुनची मदत घेऊ शकतात असं, असा सल्ला न्यूयॉर्क हेल्थ डिपार्टमेंटने दिला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – राष्ट्राध्यक्षांबरोबर सुरू असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तो झाला ‘न्यूड’ आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -