सहा जवानांना शौर्य पदके जाहीर

New Delhi
six army personnel awarded shaurya chakra
सहा जवानांना शौर्य पदके जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्काराची घोषणा केली आहे. देशाच्या रक्षणासाठी विविध मोहिमांमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सहा जवानांचा समावेश आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ओराओन यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे.

जाणून घ्या या सहा शूर जवानांबद्दल

मणिपूर येथील भारताचं इंटेलिजन्स नेटवर्क बळकत करून १४ दहशतवाद्यांना लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा यांनी हेरलं. तर मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह यांनी मणिपूरच्या जंगलात झालेल्या दहशतवादविरोधातील कारवाईत दोन दहशतवाद्यांनी कंठस्नान घालण्यात त्यांना यश मिळालं होत. तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कारवाई नायब सुभेदार नरेंद्र सिंह यांनी केली. जम्मू काश्मीरमधल्या एका ऑपरेशन मध्ये राष्ट्रीय रायफल्समधील नायब सुभेदार सोमबीर यांनी तीन दशतवाद्यांचा खात्मा केला होता. नाईक नरेश कुमार यांनी जम्म-काश्मीरमधील एका गावात लपून बसलेल्या दहशतावाद्यांना शोधून त्यांनी ठार केलं होत. शिपाई करमदेव ओराओन यांनी नियंत्रण रेषेवर २९ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी दहशतवाद्यांशी दोन हात करून नऊ ग्रेनेड फेकून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.


हेही वाचा – महाराष्ट्रातील राष्ट्रपती पुरस्कार ५४ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाहीर