घरदेश-विदेशअनंतनागमध्ये चकमक; सहा दहशतवाद्यांचा खात्मा

अनंतनागमध्ये चकमक; सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

अनंतनागमधील बीजबहेरा परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू- काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहेच. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. बीजबहेरा येथे ही चकमक झाली असून या परिसरात सध्या शोधमोहिम राबवली जात आहे.

- Advertisement -

वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; लान्स नायक शहीद


अशी झाली चकमक

अनंतनागमधील बीजबहेरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे सैन्य, जम्मू – काश्मीर पोलिसांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवली. हा संपूर्ण परिसर सुरक्षा दलांनी घेरला होता. शोधमोहिमेला सुरुवात झाली आणि जरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

- Advertisement -

सुरक्षा दलाला मिळालेले यश

शोपियॉं येथे २० नोव्हेंबर रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर सुरक्षा दलातील एक जवान या चकमकीत शहीद झाला होता. त्यानंतर गुरुवारी कुलगाम येथील सैन्याच्या तळावर दहशवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाला होता. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. गेल्या सहा दिवसात सुरक्षा दलाला हे मिळालेले हे दुसरे यश आहे.


वाचा – कोरची येथे झालेल्या चकमकीत २ नक्षल्याना कंठस्नान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -