डोक, मान सांभाळा आणि जम्प करा

जगभरात ट्रिपिंग जंम्प चॅलेंजमुळे मृत्यूच्या घटनांची नोंद

Mumbai
tripping jump
ट्रिपिंग जम्प

भारतात टिकटॉकवर प्रचंड व्हायरल झालेल्या ट्र्रिपिंग जंप चॅलेंजमध्ये आता काही घटना समोर येऊ लागल्या आहेत. देशात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये जखमी झाल्याची नोंद आहे. पण अद्याप भारतात कुठेही मृत्यूची नोंद नाही. जगभरात मात्र आता विविध ठिकाणी या चॅलेंजमुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद समोर यायला सुरूवात झाली आहे. नुकताच ब्राझिलमधील एका शाळेत या चॅलेंजदरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. किंगस्टन जमैकाच्या शिक्षण मंत्रालयाने तर जंप ट्रिप चॅलेंजविरोधात नुकतीच एक वॉर्निंगदेखील जारी केली आहे.

ब्लू व्हेल चॅलेंज, वॉटर बकेट चॅलेंज, लिप ग्लू चॅलेंज यापाठोपाठ आता जगभरात थैमान घातलेल नवीन चॅलेंज म्हणजे ट्रिपिंग जंप – स्कलब्रेकर चॅलेंज. लहान मुलांपासून मोठ्यांनाही जीव गमवावा लागेल अस हे चॅलेंज आहे. मोठ्या प्रमाणात शरीराला अनेक फ्रॅक्चरची दुखापत होईल असे हे चॅलेंज आहे. त्यामुळेच पालकांनी तसेच शाळेतही शिक्षक वर्गाने मुलांकडे लक्ष देऊन असे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सोशल मिडियावर स्कलब्रेकर चॅलेंज हे तुफान पॉप्युलर झाले असले तरीही एखाद्याच्या जीवावर बेतू शकेल अशी ही टास्क आहे. विशेषतः डोक्यावर आणि मानेवर मोठा आघात होऊन मृत्यूही ओढावू शकतो अशा प्रकारचा हा अतिशय घातक असे चॅलेंजच म्हणता येईल.

काय आहे ट्रिपिंग जंप चॅलेंज ?

या चॅलेंजमध्ये मध्यभागी एक जण उभा राहतो. तर त्याच्या शेजारी दोन जण उभे राहतात. मध्यभागी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीने उंच उडी घेतल्यानंतर शेजारचे दोघेही त्या व्यक्तीला पायाने खाली पाडतात. त्यामुळे अतिशय उंचावरून मधली व्यक्ती जोरात जमीनीवर खाली पडते. अनेकदा संपुर्ण तोल गेल्याने नेमका किती आणि कुठे मार लागेल याचा अंदाज येत नाही.

 

छोट्या मुलांमध्ये म्हणूनच हवी जागरूकता

वॉट्स एप, टिकटॉक यासाऱख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणात ट्रिपिंग जंप चॅलेंज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे छोट्या मुलांवर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता आहे. अनेक मुलांकडून हे चॅलेंज स्विकारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणूनच पालकांची जबाबदारी आहे की यामुळे होणारे धोके मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. आपली मुले इंटरनेटवर काय पाहतात हेदेखील पाहणे हे पालकांची आणि मुलांची जबाबदारी आहे.

अशी होऊ शकते दुखापत

या चॅलेंजची सुरूवात स्पेनमध्ये झाली. त्यानंतर हे चॅलेंज अतिशय लोकप्रिय झाले आहे. आतापर्यंत जगभरात दोन व्यक्तींचा या चॅलेंजमध्ये मृत्यू झाला आहे. चॅलेंज दरम्यान मधल्या व्यक्तीकडून जंम्प केल्यानंतर खाली पडताना मानेला तसेच डोक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. गुडघा, कंबर मोडणे, जॉईंटमध्ये फ्रॅक्चर होणे यासारखा धोकाही हा चॅलेंजच्या माध्यमातून बसू शकतो.