गाडीत झोपलेल्या चालकाचा मृत्यू

दिल्लीत पार्किंग लॉटमध्ये असलेल्या गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत गाडीत झोपलेला चालकाच मृत्यू झाला आहे. चालकाने सिगारेट पिल्यामुळे गाडीला आग लागल्याचा संक्षय व्यक्त करण्यात येत आहे.

Delhi
Fire
प्रातिनिधिक फोटो

दिवाळीच्या सुरुवातीला पार्किंग लॉटमध्ये पार्क असलेल्या गाडीला आग लागण्याची घटना घडली. या आगीत गाडीत झोपलेला चालकाचा भाजून मृत्यू झाला. दिल्लीतील बेगमपूर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे. मात्र आग लागण्याचे कारण अद्याप समजले नाही. गाडीला आग लागली त्यावेळी चालक गाडीत झोपला होता आग लागल्याचे समजले नसल्यामुळे या घटनेत त्याचा मृत्यू झाला. सुंदर (४०) असे या चालकाचे नाव असून तो याच परिसरात राहातो.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच चालक मृत

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार पोलिसांना या घटनेची माहिती स्थानिकांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेबाबत अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी चालकाला गाडी बाहेर काढले. चालकाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच चालकाला मृत घोषीत करण्यात आले.

सिगारेट ओढल्यामुळे लागली आग 

चालकाला सिगारेट पिण्याचे व्यसन होते. मयत चालकाच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो अनेकदा बंद गाडीमध्ये सिगारेट ओढत होतो. सिगारेटमुळे गाडीला आग लागल्याचा संशय व्यक्त केला आहे.

“सुंदरला सिगारेटचे व्यसन होते. रात्री १० वाजता सुंदर गाडीतच झोपला होता. झोपतांना त्याने मद्यपानही केले होते. मद्यपान केल्यानंतर सिगारेट पिण्याची सवय त्याला होती.”- मुकेश, मयत चालक सुंदरचा भाऊ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here