घरदेश-विदेशकुत्र्यासाठी केलं बोईंग विमानाचं इमर्जन्सी लँडिंग!

कुत्र्यासाठी केलं बोईंग विमानाचं इमर्जन्सी लँडिंग!

Subscribe

एका छोट्याशा कुत्र्याकरता मॉस्कोमध्ये एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हा कुत्रा स्वत:ला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना स्वयंचलित दरवाजा अर्धा उघडल्याने अलार्म वाजला. हा अलार्म वाजल्याने या बोइंग ७३७ विमानाचे लँडिंग करण्यात आले.

मॉस्को येथे बोइंग ७३७ या कंपनीचे विमान रविवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अचानक विमान खाली उतरवण्यात आल्याने परिसरातील नागरिक धावून आले. मात्र, हे इमर्जन्सी लँडिंग एका कुत्र्यामुळे केले असल्याची माहिती समोर आली आहे. एका छोट्या कुत्र्यासाठी जमिनीपासून १३ फूट अंतरावर असलेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

emergency landingका केले इमर्जन्सी लँडिंग?

बोइंग ७३७ या कंपनीचे विमान सेंट पीटर्सबर्ग येथून निघाले होते. हे विमान मॉस्को येथे पोहोचले असता अचानक अलार्म वाजला. मात्र हा अलार्म कसा आणि का वाजला? हे पाहण्यासाठी सहाय्यकांनी धाव घेतली. सहाय्यकाने लगेजच्या डब्यात पाहिले असता कुत्रा पिंजऱ्यातून बाहेर येणाचे प्रयत्न करत असल्याचे दिसले. परंतु, त्या कुत्र्याचे नशिब चांगले की त्या पिंजऱ्याचा दरवाजा हा स्वयंचलित असल्याने त्याचा जीव वाचला. या छोट्या कुत्र्याला बाहेर येण्यासाठी तो हाताने दरवाजाच्या तारा ओढत होता. अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आले. कुत्र्यांना ठेवण्यात आलेला पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडला होता. त्यामुळे तो अचानक अलार्म वाजला आणि १३ फूट अंतरावरुन विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -