घरदेश-विदेशजगातील 'सर्वात छोटी' गाय ! गिनीज बुकमध्ये नोंद

जगातील ‘सर्वात छोटी’ गाय ! गिनीज बुकमध्ये नोंद

Subscribe

आजवर आपण जगातील सर्वात लहान पुरुष अथवा महिला याबद्दलच अधिक ऐकले आहे. मात्र आता आपल्यासमोर आलीये जगातील सर्वात छोटी गाय. महत्वाची बाब म्हणजे जगातली ही सर्वात छोटी गाय अन्य कुठल्या देशातील नसून भारतातलीच आहे. ‘मनिकयम’ असं या गायीचं नाव असून केरळच्या अथहोली भागातील ही गाय आहे. सर्वात छोटी गाय म्हणून या गायीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

एका सर्वसामान्य गायीची उंची ही साधारण ४.८ ते ५ फूटांपर्यंत तर वजन साधारणत: 315 किलोग्रॅम इतकं असतं. मात्र, मनिकयमची उंची 1.75 फूट तर वजन 40 किलोग्रॅम इतकेच आहे. याचाच अर्थ या गायीची उंची एखाद्या बकरीपेक्षाही कमी आहे. याकारणामुळेच तिची नोंद सर्वात छोटी गाय म्हणून झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -
‘मनिकयम’ नवीन सेलिब्रीटी

जगातील सर्वात छोटी गाय म्हणून नावारुपाला आलेली मनिकयम सध्या नवी सोशल मीडिया सेलिब्रीटी बनली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत. त्यामुळे केवळ केरळातच नाही संपूर्ण भारतात ही गाय चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाल्यामुळे हळूहळू जगभरात मनिकयम गाय प्रसिद्ध होते आहे. दूरदूरवरुन अनेक पर्यटक मनिकयमला पाहण्यासाठी केरळमध्ये येत आहेत.

दरम्यान केरळातील ज्या घरात मनिकयमचा जन्म झाला आहे, तिथले लोक कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच तिची काळजी घेत आहेत. आमच्या गोठ्यात जन्मलेल्या या गायीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यामुळे आम्ही खूपच खूष असल्याची प्रतिक्रीया या लोकांनी व्यक्त केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -