भ्रष्टाचारामध्ये भाऊजी- मेहुणा एकत्र – स्मृती इराणी

रॉबर्ट वढेरा यांच्या नावाचा वापर करून राहुल गांधींंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. आज इराणी यांनी एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केला आहे.

New Delhi
smriti-irani
वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी

निवडणुक जवळ येत असतानाच काँग्रेस-भाजप दरम्यान आरोप प्रत्यारोपाचे खेळ जोरात सुरु आहे. काँग्रेसने देशाला भ्रष्टाचार दिला असे वक्तव्य वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. ईडीने टाकलेल्या एका छाप्यामध्ये ही गोष्ट समोर आली आहे. ईराणी यांनी एका विशेष पत्रकार परिषद घेऊन ही माहिती पत्रकारांना दिली आहे. भ्रष्टाचारासाठी राहुल गांधी यांनी रॉबर्ट वढेरा यांचा वापर केला असल्याचा आरोपही ईराणी यांनी केला आहे.

काय म्हणाल्या इराणी

“भ्रष्टाचार काँग्रेसने राष्ट्राला दिलेली एक भेट आहे. मागील काही तासांमध्ये प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भ्रष्टाचारात वढेरा आणि गांधी कुटुंबींयाचा एकत्र समावेश आहे. जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वढेरा सोबत राहुल गांधी यांचाही समावेश असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यावर आता राहुल गांधींना उत्तर देणे आवश्यक आहे. राहुल गांधी यांचे भ्रष्टाचाराशी अप्रत्यक्षपणे संबध आहेत. आर्थिक आणि राजकीय फायदा असल्यामुळे राहुल गांधी हे राफेल प्रकरणावर जास्त रस घेत आहेत. ” – वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here