घरताज्या घडामोडीस्मृति इराणींनी पुन्हा केला झोल; शिवजयंतीच्या शुभेच्छांमध्ये घातला घोळ!

स्मृति इराणींनी पुन्हा केला झोल; शिवजयंतीच्या शुभेच्छांमध्ये घातला घोळ!

Subscribe

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शिवजयंतीला केलेल्या एका ट्वीटमुळे त्यांची चांगलीच गोची झाली. अखेर त्यांना ट्वीट डिलीट करावं लागलं.

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कायम चर्चेत असतात. कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या वर्तनामुळे. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत त्या त्यांच्या एका ट्वीटमुळे! त्यांनी घोटाळा इतका मोठा घातला की नंतर त्यांना हे ट्वीट डिलीट देखील करावं लागलं. मात्र, मुंबई काँग्रेसने त्या ट्वीटचा स्क्रीनशॉट त्यांच्या ट्वीटरवरून शेअर केल्यामुळे स्मृती इराणींचा प्रताप समोर आला. वर ‘पुढच्या वेळेपासून काळजी घ्या’, असा सल्ला देखील मुंबई काँग्रेसनं आपल्या ट्वीटमध्ये दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्मृती इराणींची गोची झाल्याचं दिसून आलं आहे.

ट्रोलिंगला सुरुवात झाली आणि ट्वीट डिलीट झालं!

स्मृती इराणींनी सकाळीच आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९०व्या जयंतीनिमित्त ट्वीट करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर ‘महाराष्ट्र आणि भारताचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!!’ अशा मराठीत शुभेच्छा देखील दिल्या. पण त्यांनी एक गडबड केली. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी फोटो मात्र संभाजी राजांचा लावला. यामुळे सोशल मीडियावर स्मृती इराणी चांगल्याच ट्रोल होऊ लागल्या. त्यानंतर मात्र त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं.

- Advertisement -

स्क्रीनशॉटनं केली गोची!

दरम्यान, इराणी यांनी ट्वीट डिलीट करण्याआधी मुंबई काँग्रेसने त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. तो ट्वीट करत मुंबई काँग्रेसने स्मृती इराणींचं पितळ उघडं पाडलं. ‘श्रीमती स्मृती इराणी यांनी शिवजयंतीनिमित्ताने ट्वीट केलं. पण त्यासोबत फोटो जोडला संभाजी महाराजांचा. यापेक्षा अजून निष्काळजीपणा त्या करू शकत नाहीत. पण आता जर तुम्ही ट्वीट डिलीट केलंच आहे, तर पुढच्या वेळेपासून किमान ट्वीट करण्याआधी ते तपासून घ्यायला तुमच्या टीमला सांगा’, असा टोला मुंबई काँग्रेसने ट्वीटरवर हाणला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -