घरदेश-विदेशस्मृती इराणी जोमात, राहुल गांधी कोमात

स्मृती इराणी जोमात, राहुल गांधी कोमात

Subscribe

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघात पिछाडीवर आहेत. भाजपच्या स्मृती इराणी अमेठीत आघाडीवर आहेत. त्यामुळे 'स्मृती इराणी जोमात, राहुल गांधी कोमात', अशी प्रतिक्रिया जनसामान्यात उमटत आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातू आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २००४ साली त्यांनी पहिल्यांदा अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी राहुल गांधी भरघोस मतांनी जिंकून आले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये देखील राहुल गांदी या मतदारसंघातून निवडूण आले होते. २०१४ साली राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी यांनी उमेदवारी लढवली होती. परंतु, त्यावेळी स्मृती इराणी यांना यश मिळाले नव्हते. मात्र, या निवडणुकीत वेगळे काहीतरी पाहायला मिळत आहे. कारण स्मृती इराणी आघाडीवर दिसत आहेत. त्यामुले ‘स्मृती इराणी जोरात आणि राहुल गांधी कोमात’ अशा प्रतिक्रिया जनसामान्यात उमटत आहेत.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थाळावरील माहितीनुसार राहुल गांधी यांना आतापर्यंत ५९८३६ मते मिळाल्याची नोंद झाली आहे. तर स्मृती इराणी यांना ६२५२४ मते मिळाल्याची नोंद झाली आहे. सध्या राहुल गांधी अमेठीत जरी पिछाडीवर दिसत असले तरी केरळच्या वायनाड मतदारसंघात ते आघाडीवर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -