घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये ७२ दिवसांनंतर सुरू झालेली फोनसेवा एक दिवसात बंद

जम्मू-काश्मीरमध्ये ७२ दिवसांनंतर सुरू झालेली फोनसेवा एक दिवसात बंद

Subscribe

पोस्ट पेड मोबाईल सेवा सुरू झाली असली तरी प्रीपेड आणि इंटरनेट सेवा सध्या बंद

जम्मू काश्मीरमध्ये पोस्ट पेड फोन सेवा तब्बल ७२ दिवसांनंतर सुरू करण्यात आली होती. मात्र SMS सेवा एकादिवसांत बंद करण्यात आली आहे. ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० नूसार घेण्यात आलेल्या निर्णयानंतर या राज्यात १४ ऑक्टोबरला मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे.

येथे पोस्ट पेड मोबाईल सेवा सुरू झाली असली तरी प्रीपेड SMS सेवा आणि इंटरनेट सेवा सध्या बंद आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवरील निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून विशेष राज्याचा दर्जा मागे घेण्यात आल्यानंतर त्याचे रूपांतर दोन केंद्र शासित प्रदेशात करण्यात आले. सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर तेथील दूरसंचार सेवा पुर्णतः ठप्प करण्य़ात आले होते. ही SMS सेवा संध्याकाळी पाच वाजेनंतर बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रीपेड सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ३० लाख

वृत्तमाध्यमांनी सादर केलेल्या अहवालानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये ७० लाख लोकं मोबाईलचा वापर करतात. यामध्ये जास्तीत जास्त पोस्टपेडचा वापर करतात. त्यांची संख्या साधारण ४० लाखांच्या आसपास आहे. तसेच ३० लाख लोकं प्रीपेड सेवा वापरणाऱ्यांची संख्या आहे. तेथील राहणारे लोकं ही सेवा लवकरात लवकर कधी सुरू होईल, याच्या प्रतिक्षेत आहे.


हेही वाचा- जम्मू काश्मीरमध्ये टेलिफोन, इंटरनेट सेवा पूर्वपदावर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -