घरदेश-विदेशVVPAT मशीनमधून निघाला साप आणि मग पुढे झालं असं

VVPAT मशीनमधून निघाला साप आणि मग पुढे झालं असं

Subscribe

व्हीव्हीपॅट मशीनमध्ये साप घुसल्याने मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतदानही काही काळ थांबवण्यात आलं होतं.

मतदान केंद्रावर मतदानादरम्यान एव्हीएम मशीन बंद पडणं आता नवीन राहीलं नाही. याना त्या कारणानं हे मशीन बंद पडत असतं. यावर्षीपासून मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटचा वापर केला जात आहे. केरळमध्ये कन्नूर येथे मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीन बंद पडले आहे. या व्हीव्हीपॅट मशीनमध्ये चक्क साप गेल्यामुळे हे मशीन बंद पडंल आहे.

व्हीव्हीपॅट मशीनमध्ये साप घुसल्याने मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे या मतदान केंद्रावरील मतदानही काही काळ थांबवण्यात आलं होतं. सकाळपासूनच मतदानासाठी केंद्रावर लोकांनी गर्दी केली होती. मतदान सुरू असतानाच व्हीव्हीपॅटमध्ये साप घुसल्याने एकच खळबळ उडाली. मतदान केंद्रावर तणावच वातावरण निर्माण झालं. मतदानासाठी आलेल्या काही लोकांनीच व्हीव्हीपॅट मशीनमधून हा साप बाहेर काढला. त्यानंतर पुन्हा मतदानास सुरुवात झाली.

 

View this post on Instagram

 

Voted! It feels great to be taking part in our democratic process.

A post shared by Chowkidar Narendra Modi (@narendramodi) on

- Advertisement -

कन्नूर लोकसभा मतदारसंघात पी. के. श्रीमती (माकपा-एलडीएफ),सुरेंद्रन (काँग्रेस-यूडीएफ) आणि सी के पद्मनाभन (भाजपा-राजग) अशी तिरंगी लढत होत आहे. केरळमध्ये एकून २० लोकसभा मतदारसंघ असून आज या सर्व जागांवर मतदान होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -