सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं निधन

सामाजिक मुद्द्यांवर नेहमी भाष्य करणाऱ्या स्वामी अग्निवेश निधन झाले आहे.

social activist swami agnivesh passes away
स्वामी अग्निवेश

सामाजिक मुद्द्यांवर नेहमी भाष्य करणाऱ्या स्वामी अग्निवेश निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांची प्रकृतीही खालावली होती. लीव्हर सोरायसीस या आजारावर त्यांचे दिल्लीतील लिव्हर अँड बायिलरी सायन्सेस रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लीव्हर सोरायसीस या आजाराने त्यांना अक्षरश: ग्रासले होते. तसेच शरीरातील महत्त्वाच्या अवयवांनी देखील काम करणे बंद केले होते. मंगळवारी त्यांची तब्येत अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तसेच वरिष्ठ डॉक्टरांचं एक पथक त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतं. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली.

स्वामी अग्निवेश यांच्याविषयी…

१९७० मध्ये स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. १९७७ मध्ये हरियाणाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार देखील स्वीकारला होता. दरम्यान, २०११ मध्ये त्यांनी लोकपालसाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते. मात्र, काही मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून दूर झाले होते. स्वामी अग्निवेश हे बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते.


हेही वाचा – ‘प्रेमनगरी’ आग्र्यात खळबळ! पत्नीला प्रियकरासह रंगेहात पकडलं; पतीनं चपलेनं थोबडवलं