घरदेश-विदेशमुझ्झफरपूर प्रकरण : सामाजिक न्याय मंत्री मंजू वर्मांचा राजीनामा

मुझ्झफरपूर प्रकरण : सामाजिक न्याय मंत्री मंजू वर्मांचा राजीनामा

Subscribe

मंजू वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरले. त्यावेळी बालिका गृहाचा चालक ब्रिजेश ठाकूरचे सगळे कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करण्याची मागणी करत त्यातून खरे बाहेर येईल असे सांगितले

मुझ्झफरपूरमधील बालिका गृहातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात आता अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणातील गुन्हेगारांना अद्याप शिक्षाही झाली नाही. त्या आधीच बिहारच्या सामाजिक न्याय मंत्री मंजू वर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. धक्कादायक म्हणजे या मंजू वर्मा यांचे पती चांदेश्वर वर्मा यांचा या प्रकरणात सहभाग असल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचे कळत आहे.

नितीश कुमारांकडे दिला राजीनामा

मुझ्झफरपूरमधील बिहार सरकारच्या बालिकागृहांमध्ये हा घृणास्पद प्रकार सुरु होता. या प्रकरणात अनेकांची नावे आता समोर येऊ लागली आहेत. या प्रकरणाशी संबंधित कोणालाही माफी मिळणार नाही. तर कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले होते. या राजीनाम्याविषयी प्रसारमाध्यमांना माहिती देताना नितीश कुमार यांनी हा सर्वस्वी मंजू वर्मा यांचा निर्णय असल्याचे सांगितले. सध्या तपास सुरु असून दोषींना कठोर शिक्षाच होईल, असे ते म्हणाले.

- Advertisement -

कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करा

मंजू वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरले. त्यावेळी बालिका गृहाचा चालक ब्रिजेश ठाकूरचे सगळे कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करण्याची मागणी करत त्यातून खरे बाहेर येईल असे सांगितले. शिवाय या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे देखील त्या म्हणाल्या.

चांदेश्वर वर्मांचे ठाकूरशी बोलणे

आरोपी ब्रिजेश ठाकूर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचे अनेक मंत्र्याशी बोलणे होते. त्यात मंजू वर्मा यांचे पती चांदेश्वर वर्मा यांचाही समावेश आहे. चांदेश्वरशी जानेवारी ते जून या काळामध्ये ब्रिजेश ठाकूर याच्याशी १७ वेळा बोलणे झाले. पण  हे बोलणे कामासाठी झाले असल्याचे आरोपी ब्रिजेश ठाकूर याने सांगितले.  मंजू वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदेश्वर वर्मा (पती) सोबत एकदाच बालिका गृहाला भेट दिली असल्याचे त्या म्हणाल्या.

नेमकं हे प्रकरण काय?

वाचा- बलात्कार करुन मुलीला गाडले, शेल्टर होममधील धक्कादायक प्रकार
वाचा- झोपेचे औषध देऊन चिमुरडयांवर केला जात होता ‘बलात्कार’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -