रायफल स्वच्छ करताना गोळी सुटून जवानाचा मृत्यू

Visakhapatnam
रायफल स्वच्छ करताना गोळी सुटून जवानाचा मृत्यू

रायफल स्वच्छ करीत असताना चुकून गोळी सुटल्याने पोलिस जवानाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सिरोंचा येथे घडली आहे. संजीव रामय्या शेट्टीवार असे या जवानाचे नाव आहे. संजीव ३० वर्षांचे होते. ते विशाखापट्टणम येथील नरसिंहापल्लीचा रहिवाशी होते. संजीव शेट्टीवार हे सिरोंचा पोलिस ठाण्यात क्युआरटी पथकात कार्यरत होते, अशी माहिती मिळाली आहे. सकाळी रायफल स्वच्छ करीत असताना अचानक गोळी सुटून संजीव शेट्टीवार यांना लागली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.


हेही वाचा – पुरात अडकलेल्या ३२ पर्यटकांची सैन्यदलाच्या जवानांनी केली सुटका