घरताज्या घडामोडीथायलंड : माथेफिरु सैनिकाचा बेछूट गोळीबार; २७ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

थायलंड : माथेफिरु सैनिकाचा बेछूट गोळीबार; २७ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

Subscribe

थायलंडमध्ये एका माथेफिरु सैनिकाने बेछूट गोळीबार केला असून या घटनेमध्ये २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत.

मॉलमध्ये एका माथेफिरु सैनिकाने बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना थायलंडमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. या माथेफिरुला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

थायलंडच्या नाखोन रत्चासिमा शहरातील टर्मिनल २१ मॉलमध्ये एक माथेफिरु सैनिक घुसला होता. या माथेफिरु सैनिकाने अचानक लोकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या गोळीबारात तब्बल २७ जणांचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मॉलमधील सर्व लोकांना बाहेर काढत माथेफिरुला ठार केले. जक्रापंथ थोम्मा असे या माथेफिरु सैनिकाचे नाव आहे. जक्रापंथ या माथेफिरुचे त्याच्या सहकर्मचाऱ्यांशी भांडण झाले होते. हे भांडण झाल्यानंतर त्यांने बंदूक उचलली आणि कमांडरचा खून केला. त्यानंतर हा माथेफिरु मॉलमध्ये घुसला. मॉलमध्ये घुसल्यानंतर या माथेफिरुने मॉलमधील लोकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी या गोळीबाराचा फेसबुक लाईव्ह केले होते. तसेच त्यासंबंधित पोस्टही आणि सेल्फीही टाकत होता. तब्बल १७ तासांची ही चकमक सुरु होती. या चकमकीत २७ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – चित्रपट पाहताना एका व्यक्तीचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -