घरदेश-विदेशभीषण! मोठ्या भावावर जास्त प्रेम करते म्हणून धाकट्याने आईचा गळा चिरला!

भीषण! मोठ्या भावावर जास्त प्रेम करते म्हणून धाकट्याने आईचा गळा चिरला!

Subscribe

आपल्याच जवळच्या व्यक्तींचा जीव घेण्याइतपत लोकांची मानसिकता विकृत आणि विकोपाला गेली आहे का? असा प्रश्न निर्माण होण्यासारखी घटना नुकतीच समोर आली आहे. आपली आई आपल्या मृत्यू पावलेल्या मोठ्या भावावर आपल्यापेक्षाही जास्त प्रेम करते, या ईर्ष्येपोटी धाकट्या भावाने आपल्या जन्मदात्या आईचीच गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भीषण बाब म्हणजे ही सगळी घटना आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतली आहे. यासंदर्भात चौकशी करून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना दिली. मुलाच्या चौकशीमधून समोर आलेला प्रकार पोलिसांसाठीही धक्कादायक असाच होता.

हा प्रकार घडला मध्य प्रदेशमध्ये…

रेवा जिल्ह्याच्या खाटिका गावामध्ये ४४ वर्षीय सावित्री पांडे पती आणि आपल्या दोन मुलांसोबत राहात होत्या. त्यांच्या मोठ्या मुलाचं गेल्या वर्षी काही कारणामुळे निधन झालं. त्याच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला होता. पण त्यांचा धाकटा मुलगा धीरेंद्र त्यांच्यावर नाराज होता. आपल्यापेक्षा मोठ्या भावावर जास्त प्रेम करते म्हणून त्याची आईविषयी तक्रार होती. त्याचं यावरून अनेकदा आईशी, वडिलांशी आणि मोठा भाऊ जिवंत होता, तेव्हा भावाशी भांडण देखील झालं होतं.

- Advertisement -

रविवारी देखील त्याचं आईसोबत भांडण झालं…

नोकरी नसल्यामुळे आधीच तणावात असलेला धीरेंद्र या कारणामुळे अधिकत रागीट झाला होता. रविवारी सकाळी झालेल्या भांडणात धीरेंद्रचा राग इतका अनावर झाला की त्याने धारधार शस्त्राने आईचा गळा चिरला. आपल्या डोळ्यांसमोर आईनं प्राण सोडल्यानंतर त्याने मृतदेह जवळच्या जंगलात फेकून दिला. धीरेंद्रचे वडिल घरी आले, तेव्हा त्यांना सावित्री दिसल्या नाहीत. त्यांनी आसपास चौकशी केली. शोधाशोध केली, तेव्हा सावित्रींचा मृतदेह त्यांना जंगलात सापडला. त्यावरून त्यांनी लागलीच पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

धीरेंद्रने दिलेल्या कबुली जबाबामध्ये…

त्याने आईची हत्या केल्याचं कबूल केलं. इतकंच नाही, तर त्याने या गुन्ह्याचा व्हिडिओ देखील मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचं पोलिसांना समजलं. या व्हिडिओमध्ये सावित्री धीरेंद्रकडे आपल्या प्राणांची भीक मागताना दिसत आहे. मात्र, अतिशय क्रूरपणे धीरेंद्रने त्यांचा गळा कापून त्यांची हत्या केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी धीरेंद्रविरोधात भागंवित्या कलम ३०२नुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -