घरCORONA UPDATEVideo: चीनी वस्तूंवर टाका बहिष्कार; रिअल लाईफ 'रेंचो'चे चीनला सडेतोड उत्तर

Video: चीनी वस्तूंवर टाका बहिष्कार; रिअल लाईफ ‘रेंचो’चे चीनला सडेतोड उत्तर

Subscribe

बॉलीवूडमधील ३ इडियट्स चित्रपटातील रेंचो तर अभिनेता आमिर खान आहेत. मात्र त्यांनी ज्या व्यक्तीची ही भूमिका साकारली आहे ते रिअल लाईफ रेंचो म्हणजेच सोनम वांगचुक यांनी कोरोना संकटाला कारणीभूत ठरलेल्या चीनला सडेतोड उत्तर दिले आहे. देशात सध्या चीनची सीमा असलेल्या लडाख शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावर रॅमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते आणि ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांनी चीनवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला आहे. त्यासंबंधीचा एक व्हिडिओ त्यांनी जारी केला आहे. यामध्ये त्यांनी नागरिकांना चीनी वस्तू खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले सोनम वांगचुक

जर भारतात चीनी वस्तूंची खरेदी बंद झाली तर चीनची अर्थव्यवस्था ढासळेल. त्यातून घाबरून ते चर्चेसाठी तयार होतील. जेव्हा सीमेवर तणावाचे वातावरण असते, तेव्हा देशातील नागरिक आपापल्या घरामध्ये निवांत झोपू शकतात. कारण आपल्या रक्षणासाठी सीमेवर आपले जवान तैनात असतात. मात्र आता चीनने दोन्ही बाजूंनी देशावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. भारत दरवर्षी साधारण ५ लाख करोड रुपयांचे चीनी सामान विकत घेतो. याच पैशांचा वापर चीनी त्यांच्या लष्करी दलावर करतात. हेच लष्करी सैन्य आपल्या भारतीय सैन्यांवर गोळीबार करत आहेत. त्यामुळे चीनी वस्तूंऐवजी भारतीय वस्तूंना प्राधान्य दिल्यास आपली अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. तसेच देशातील तरुण उद्योजकांनाही प्रगती करता येईल. यामुळे देशाचीच प्रगती होणार असल्याचेही वांगचुक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

नको तो आजार, औषधोपचार आणि रूग्णालयंही! एका कोरोनाग्रस्ताची आपबिती!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -