राहुल गांधींसोबत सोनिया गांधी परदेशात रवाना; दोन आठवडे घेणार उपचार

shivsena slams senior congress leader who wrote letter sonia gandhi
सोनिया गांधी आणि राहुल गांधी

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी परदेशी गेल्या असून त्या दोन आठवडे तिथेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यासोबत मुलगा राहुल गांधीदेखील असल्याचे समजते. हे दोघेही परदेशातून परतल्यानंतर संसदेच्या विशेष पावसाळी अधिवेशनात सहभागी होतील, असे सांगितले जात आहे. सोनिया गांधी यांनी परदेशात जाण्यापूर्वी पक्षाच्या संसदीय रणनीती समूहाशी बैठक घेतली. त्यात देशावर परिणाम करणारे मुख्य मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चांगला समन्वय राखण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा –

Ready Reckoner : मुंबई, ठाणे, नाशिकला अल्पशी वाढ