घरदेश-विदेशलवकरच पुन्हा भरारी घ्यायचीय!

लवकरच पुन्हा भरारी घ्यायचीय!

Subscribe

नवी दिल्ली, पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान जमीनदोस्त करणारे, जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांची आकाशाची ओढ कायम आहे. पाकिस्तानी सैन्याला कोणतीही माहिती न देणार्‍या अभिनंदन यांनी पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली. मला लवकरच विमान उडवायचे आहे, अशी भावना अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकार्‍यांकडे व्यक्त केली. नवी दिल्लीतील सैन्याच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अभिनंदन यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि वरिष्ठ कमांडोंनी अभिनंदन यांची भेट घेतली. यानंतर वरिष्ठ कमांडो आणि डॉक्टरांकडे अभिनंदन यांनी लवकरात लवकर विमान उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. अभिनंदन यांचे मिग 21 विमान कोसळल्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांच्या हाती लागले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीने त्यांच्याकडे असणारी गोपनीय कागदपत्रे नष्ट केली.

- Advertisement -

पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांनी कोणतीही गोपनीय माहिती सांगितली नाही. एफ-16 विमान पाडणार्‍या आणि जवळपास 58 तास पाकिस्तानच्या ताब्यात असताना कोणतीही गोपनीय माहिती न देणार्‍या अभिनंदन यांच्या कामगिरीची चर्चा सध्या देशात सर्वत्र सुरू आहे.

अभिनंदन यांच्या पाठीला दुखापत; वैद्यकीय चाचणीत खुलासा

- Advertisement -

पाकिस्तानच्या ताब्यात ६० तास घालवल्यानंतर पुन्हा सन्मानाने भारतात परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूला जखम झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, त्याच्या शरीरात बाहेरील कोणतीही कृत्रिम वस्तू आढळून आलेली नाही. दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटलमध्ये झालेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे. एएनआयच्या माहितीनुसार, अभिनंदन यांच्या एमआरआय स्कॅनमध्ये मारहाणीचे घाव मिळालेले नाहीत. मात्र, पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूला जखम झालेली आहे. असे सांगितले जात आहे की, त्यांचे मिग २१ विमान कोसळल्यानंतर पॅराशूटने खाली उतरताना ते जमिनीवर आदळल्याने त्यांच्या मणक्याला जखम झाली असावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -