घरट्रेंडिंगतिने SOS मेसेज जमिनीवर कोरला, अक्कल हुशारीने जीव वाचला!

तिने SOS मेसेज जमिनीवर कोरला, अक्कल हुशारीने जीव वाचला!

Subscribe

कधीकधी समोरच्या अडचणींवर मात करण्यासाठी दाखवलेलं प्रसंगावधान आपला जीव वाचवण्यासाठी पुरेसं ठरतं. ऑस्ट्रेलियामधल्या एका महिलेनं दाखवलेलं असंच प्रसंगावधान आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिने लढवलेली भन्नाट कल्पना तिचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची ठरली. आपला जीव वाचवण्यासाठी तिने चक्क जमिनीवर SOS मेसेज कोरला आणि वैराण जंगलामध्ये स्वत:चा जीव वाचवला. हा प्रसंग ऑस्ट्रेलियामध्ये तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

डेबोरा पिलग्रीम असं या महिलेचं नाव असून १३ ऑक्टोबर रोजी ती पूर्व ऑस्ट्रेलियामधल्या माऊंट लोफ्टी भागामध्ये ट्रेकिंगसाठी गेली होती. माऊंट लोफ्टीमध्ये कॅम्पवर सहकाऱ्यांसोबत पार्टी केल्यानंतर डेबोरा कॅम्पमधून बाहेर पडली. मात्र लवकरच आपण हरवलो असल्याचं तिला लक्षात आलं. त्यानंतर मात्र, रस्ता शोधण्याचा प्रयत्न तिने करूनही तिला सापडला नाही. त्यानंतर मात्र डेबोरा घाबरली. पण तिने हार नाही मानली.

- Advertisement -

Video: कबरीतून आला मृत वडिलांचा आवाज आणि….!

एकीकडे डेबोरा जंगलात हरवली असतानाच दुसरीकडे तिच्या शोधासाठी शोधपथकांनी मोहीम सुरू केली. जंगलात पथकं पाठवण्यात आली. पण तिचा शोध काही लागत नव्हता. अखेर तिचा पत्ता लागला. आणि तोही तिच्याच अक्कल हुशारीमुळे!

डेबोरानं जंगलात फिरताना एक सुरक्षित जागा शोधली. आपण या जागी आहोत, हे शोधणाऱ्यांना कळावं, म्हणून तिने जमिनीच्या मोकळ्या भागात मोठ्या अक्षरांमध्ये SOS असा मेसेज कोरला. मदतीची विनंती करण्यासाठी या अक्षरांचा वापर केला जातो. हा मेसेज त्याच भागात लावलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये दिसला. बचाव पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि महिलेचा शोध लागला. डेबोराच्या प्रसंगावधानामुळे तिचा प्राण वाचणं शक्य झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -