घरCORONA UPDATEकोरोनामुळे अडकलेल्या कुत्र्यांसाठी विशेष जेट प्लेन, एका तिकिटाचा खर्च दीड लाख!

कोरोनामुळे अडकलेल्या कुत्र्यांसाठी विशेष जेट प्लेन, एका तिकिटाचा खर्च दीड लाख!

Subscribe

कोरोनाच्या संकटामुळे सध्या देशात स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं स्थलांतर होत असल्याचं मानलं जात आहे. लाखोंच्या संख्येनं मजूर आणि इतर नोकरदार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. यामध्ये सर्वाधिक स्थलांतर देशाच्या इतर भागातून मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये होत आहे. या मजुरांकडे स्थलांतरासाठी येणारा खर्च देण्याइतपत देखील पैसे नसल्यामुळे त्यांच्या प्रवासाचा खर्च सरकारकडून केला जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर एक अजब बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे राजधानी दिल्लीमध्ये अडकलेल्या काही पाळीव कुत्र्यांना परत त्यांच्या घरी मुंबईला आणण्यासाठी एका स्वतंत्र जेट प्लेनचीच व्यवस्था करण्यात आली आहे. या जेट प्लेनमध्ये प्रत्येक तिकीटाचा खर्च अर्थात प्रत्येक कुत्र्याला नेण्याचा खर्च तब्बल १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे जेट प्लेन पूर्णपणे कुत्र्यांसाठीच असून त्यामध्ये ६ सीट्स आहेत.

मुंबईतल्या दीपिका सिंह या तरुणीने कल्पना सुरू केली आहे. त्यांचे काही नातेवाईक दिल्लीमध्ये अडकले होते. त्यांच्यासाठी तिने दिल्ली ते मुंबई अशा एका स्पेशल जेटची व्यवस्था केली. मात्र, त्यांच्यापैकी काहीजण इतर प्रवाशांच्या कुत्र्यांसोबत प्रवास करू इच्छित नव्हते. त्यातून दीपिकाला खास कुत्र्यांसाठी एक स्वतंत्र जेट प्लेनच मागवण्याची कल्पना सुचली. अॅक्रिएशन एविएशन कंपनीकडून तिने एक ६ सीट्सचं जेट प्लेनच भाड्याने मागितलं. या प्लेनचं भाडं होतं ९ लाख ६ हजार रुपये. म्हणजेच, एका कुत्र्याच्या प्रवासाचा खर्च १ लाख ६० हजारांच्या घरात जातो. आत्तापर्यंत ४ मालकांनी आपले कुत्रे या स्पेशल जेटने आणण्याची तयारी दाखवली असून अजून दोन जागाही येत्या आठवड्याभरात भरतील असा अंदाज आहे. या जेटला ऑल पेट प्रायव्हेट जेट असं नाव देण्यात आलं आहे.

- Advertisement -

कुत्र्यांचंही होणार थर्मल स्क्रीनिंग

दररम्यान, या जेटमधून प्रवास करणाऱ्या सर्व कुत्र्यांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जाणार आहे. तसंच, या कुत्र्यांना प्लेनमध्ये स्वतंत्र पिंजऱ्यांमध्येच ठेवलं जाणार आहे. अनलॉक १.०ची घोषणा झाल्यानंतर प्रवासी विमानांना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर या खास कुत्र्यांसाठीच्या जेट प्लेनला देखील परवानगी मिळण्यात काहीही अडचण येणार नाही, अशी खात्री संबंधित विमान कंपनीला वाटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -