घरदेश-विदेश'या' पोलीस स्टेशनमध्ये भरते मुलांची शाळा!

‘या’ पोलीस स्टेशनमध्ये भरते मुलांची शाळा!

Subscribe

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी देहरादूनच्या एका पोलीस स्टेशनध्ये ही खास शाळा भरते. या शाळेत सध्या ५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

उत्तराखंडच्या देहरादूनमधील प्रेमनगर पोलीस स्टेशन सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. देहरादूनमधील अन्य पोलीस स्टेशनपेक्षा हे पोलीस स्टेशन खास असल्याचं बोललं जात आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे इथे भरणारी लहान मुलांची शाळा. खास झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी ही विशेष शाळा भरवली जाते. प्रेमनगर पोलीस स्टेशनच्या एका खोलीमध्ये दररोज भरणाऱ्या या शाळेत, एका NGO द्वारे मुलांना शिकवले जाते. दरम्यान ही शाळा आता इतकी नावारुपाला आलीये, की दिवसांतून चक्क २ वेळा इथे मुलांचे वर्ग भरवले जातात. दोन शिफ्टमध्ये मिळून एकूण ५१ विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. ‘आसरा ट्रस्ट’ या एनजीओचे कार्यकर्ते या मुलांना शिकवण्याचे काम करतात. खास पोलीस स्टेशनमध्ये भरणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांना इंग्लिश, गणित आणि हिंदी हे तीन विषय शिकवले जातात.

हेही वाचा: शशी थरूर यांच्या पुस्तकावर ‘वेब सीरीज’ची निर्मिती

स्थानिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रेमनगर पोलीस स्टेशनचे मुकेश त्यागी यांनी सांगितल्यानुसार, ‘आसरा ट्रस्ट यांनी दिलेल्या प्रस्तावानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग भरवण्यासाठी परवानगी दिली’. पोलीस स्टेशनमध्ये ही शाळा सुरु झाल्यानंतर स्थानिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कुणी मुलांना शाळेत पोहचवण्याचे तर कुणी मुलांना शाळेतून घरी नेण्याचे काम स्वेच्छेने स्विकारले. तर काही लोकांनी या विद्यार्थ्यांच्या रोजच्या जेवणाची सोय केली.

- Advertisement -

अन्य प्रकारच्या शिक्षणावरही भर

दरम्यान मुलांना शिकवणाऱ्या एक शिक्षीका राखी म्हणाल्या, की ”शालेय शिक्षणासोबतच इथल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे शिक्षण देण्याचा प्रयत्नात आम्ही आहोत. लवकरच या शाळेमध्ये मुलांना कॉम्प्युटर हाताळण्याचे आणि त्याच्या वापराचे शिक्षण दिले जाईल. याशिवाय शाळेतील मोठ्या मुलींना शिवणकलेचं प्रशिक्षण देण्याचाही आमचा विचार आहे.”

खुशखबर : फेसबुकमध्ये 20 हजार नोकऱ्यांची बंपर ऑफर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -