घरदेश-विदेशजेट एअरवेजच्या मदतीला स्पाईस जेट; ५०० कर्मचाऱ्यांना दिली नोकरी

जेट एअरवेजच्या मदतीला स्पाईस जेट; ५०० कर्मचाऱ्यांना दिली नोकरी

Subscribe

जेटची प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाईस जेट कंपनीने ५०० कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत समाविष्ट करून घेतले आहे.

देशातील पहिली यशस्वी खासगी विमानसेवा जेट एअवेजवर गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकट ओढावले होते. आर्थिक टंचाईला जेट एअरवेज सामोरे जात असल्याने जेट एअरवेज पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला. त्यामुळे जेट एअवेजच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आल्याचे दिसले. परंतु आर्थिक डबघाईच्या कारणामुळे बंद पडलेल्या या जेट एअवेजच्या कर्मचाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना दिलासा

जेटची प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाईस जेट कंपनीने ५०० कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत समाविष्ट करून घेतले आहे. यामध्ये जेटचे १०० वैमानिक, २०० केबिन क्रू कर्मचारी आणि २०० तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी या कर्मचाऱ्यांना दिलासा देत काही दिवसात आम्ही जेटच्या आणखी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घेऊ, असे आश्वासनही स्पाईस जेटने दिले आहे. तसेच जेटचे काही विमाने स्पाईस जेटकडून विकत घेतली जाऊ शकतात, असे ही सांगण्यात आले.

- Advertisement -

स्पाईस जेटचे २७ नवे विमानं सेवेत दाखल

गुरूवारी मुंबई-दिल्ली मार्गावर २४ नव्या उड्डाणांची घोषणा स्पाईस जेटने केली. या नव्या उड्डाणांची सेवा २६ एप्रिल ते २ मे या कालावधीत सुरु होईल. याशिवाय, स्पाईस जेटने २७ नवीन विमाने सेवेत लवकरच दाखल करण्याची घोषणा देखील केली आहे. यामध्ये २२ बोईंग ७३७ एस आणि पाच टर्बोप्रॉप बंबार्डिअर Q400 या विमानांचा यामध्ये समावेश आहे. जरी जेटची सेवा बंद पडली असली तरी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची कमी झालेली संख्या भरून काढता येईल.

- Advertisement -

अर्थसहाय्य न दिल्याने कंपनीचा निर्णय

गुरूवारी, १७ एप्रिलच्या मध्यरात्री जेट एअरवेजने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ही सेवा सुरळीत रहावी याकरिता ४०० कोटींची गरज होती. मात्र, कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य न दिल्याने जेट कंपनीस हा निर्णय घ्यावा लागला. यामुळे जेटच्या तब्बल २० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -