घरCORONA UPDATEदेशात बाधितांची संख्या ६० लाखांपार; आतापर्यंत ९५,५४२ कोरोनाचे बळी

देशात बाधितांची संख्या ६० लाखांपार; आतापर्यंत ९५,५४२ कोरोनाचे बळी

Subscribe

गेल्या २४ तासात कोरोनाचे ८२ हजार १७० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर या काळात व्हायरसमुळे १ हजार ३९ लोकांचा मृत्यू

भारतात कोरोनाचा वाढता कहर अद्याप सुरूच असून दररोज कोरोनाचे नवे रुग्ण वाढत आहे. सोमवारी कोविड -१९ च्या रूग्णांची संख्या ६० लाखांच्या पुढे गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात कोरोनाचे ८२ हजार १७० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर या काळात व्हायरसमुळे १ हजार ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या आकडेवारीनुसार, देशात कोरोना संक्रमित रूग्णांची एकूण संख्या ६० लाख १६ हजार ५२१ पर्यंत पोहोचली आहे. तर ५० लाख १६ हजार ५१२ लोकांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहेत आणि रुग्णालयात उपचारानंतर घरी परतले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे ९५ हजार ५४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात २७ सप्टेंबर पर्यंत ७ कोटी १९ लाख ६७ हजार २३० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे. यापैकी रविवारी दिवसभरात ७ लाख ९ हजार ३९४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने दिली आहे.

- Advertisement -


Lata Mangeshkar’s Birthday: लता दीदींची TOP 10 ‘सदाबहार’ गाणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -