CoronaVirus: बाधितांच्या आकड्यांत आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद; २४ तासांत ९०,६३३ नवे रुग्ण

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ४१ लाखांपार!

India's COVID19 case

भारतात कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी ४१ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर रविवारी कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. रविवारी ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३१ लाख ८० हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १ हजार ६५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ७० हजार ६२६ वर गेली आहे. देशात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून ४१ लाख १३ हजार ८१२ वर पोहोचले आहे. त्यापैकी ८ लाख ६२ हजार ३२० लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर ३१ लाख ८० हजार ८६६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ५ सप्टेंबरपर्यंत देशभरात एकूण ४ कोटी ८८ लाख ३१ हजार १४५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे तर त्यापैकी शनिवारी एका दिवसात १० लाख ९२ हजार ६५४ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.


Corona: आता ऑन डिमांड करा कोरोना चाचणी