घरदेश-विदेशभय्यूजी महाराजांची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली

भय्यूजी महाराजांची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली

Subscribe

अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली. इंदूरच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिलटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. भय्यूजी महाराज गेल्या काही दिवसापासून आजारी होते. दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये “मी माझ्या आयुष्यात तणावाखाली आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये” असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे भय्यूजी महाराज यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येणार आहे त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे एक प्रकारचे गूढ निर्माण झालं आहे.

bhayyuji maharaj suicide not
भय्यूजी महाराज यांची सुसाइड नोट

पोलिसांनी घटनास्थळ केले सील

दरम्यान इंदूर पोलिसांनी भय्यूजी महाराज यांचे घर सील केले असून तपास सुरु आहे. इंदूर बॉम्बे हॉस्पिटलबाहेर भय्यूजी महाराजांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे. हॉस्पिटलच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यमंत्री पदाचा प्रस्ताव नाकारला

मध्यप्रदेश सरकारने काही दिनसांपूर्वीच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. मात्र त्यांनी मध्यप्रदेश सरकारचा हा प्रस्ताव स्विकार केला नव्हता. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की, “संतांना कोणत्याही पदाचे महत्व नसते. लोकांची सेवा करणे याला ते अधिक महत्व देतात.”

१३ महिन्यांपूर्वी केलं दुसरं लग्न

भय्यूजी महाराज यांनी १३ एप्रिल २०१७ रोजी मध्यप्रदेशच्या शिवपूरी येथील डॉ. आयुषी शर्मा हिच्याशी दुसरे लग्न केले होते. त्यांची पहिली पत्नी माधवी देशमुख यांचे २०१५ मध्ये हार्ट अटॅकने निधन झाले होते. त्यांना १३ वर्षाची मुलगी असून ती पुण्यात शिक्षण घेत आहे.

- Advertisement -

राजकीय नेत्यांचा चांगले संबंध

४८ वर्षांच्या भय्यूजी महाराज यांचे नाव उद्यसिंह देशमुख होते. मध्यप्रदेशच्या शुजालपूरमध्ये त्यांचा जमीनदार कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील महाराष्ट्र काँग्रेसचे दिग्गज नेते राहिले आहेत. भय्यूजी महाराज यांचे अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते. इंदूरमध्ये भय्यूजी महाराज यांचे राहते घर आणि आश्रम आहे. १९९६ सूर्योद्य परिवार आणि आश्रमाची स्थापना केली. भय्यूजी महाराज यांनी समाजाला दिशा दाखवली, लोकांना जगायचे कसे हे शिकवलं. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

यांनी दिली होती आश्रमाला भेट

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, गायिका लता मंगेशकर, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, गायिका आशा भोसले, अनुराधा पौंडवाल, अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी भय्युजी मराहाज यांच्या आश्रमाला भेट दिली होती.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -