घरदेश-विदेश'हल्ल्याच्या २ तासआधी भारताने दिला होता श्रीलंकेला इशारा'

‘हल्ल्याच्या २ तासआधी भारताने दिला होता श्रीलंकेला इशारा’

Subscribe

विक्रमसिंघे यांनी सांगितले की, हल्ल्यामध्ये स्थानिक कट्टरतावादी संगठनेचा हात आहे. मात्र हल्ला घडवून आणण्यासाठी विदेशी दहशतवादी संघटनेची मदत घेण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत ३५० जणांचा मृत्यू झाला आहे तर ४५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेत झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटावर दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती समोर येत आहे. साखळी बॉम्बस्फोट होण्याआधीच भारताच्या गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी श्रीलंकेच्या गुप्तचर विभागाला माहिती दिली होती. दोन तास आधीच श्रीलंकेला ही माहिती देण्यात आली होती अशी माहिती श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, भारताकडून याबाबत माहिती मिळाली होती मात्र आमच्याकडून चूक झाली. भारताकडून मिळालेल्या माहितीवर आम्ही काहीच कारवाई करु शकलो नाही. आमच्याकडून खूप निष्काळजीपणा झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हल्ल्याची मिळाली होती माहिती

श्रीलंकेची सुरक्षा यंत्रणा आणि भारत सरकारच्या सुत्रांनी सांगितले की, भारतीय गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी बॉम्बस्फोट होण्याच्या २ तास आधी श्रीलंकेच्या गुप्तचर विभागाशी संपर्क केला होता. त्यांनी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, विक्रमसिंघे यांनी सांगितले की, या हल्ल्याबाबत तपास करणारे अधिकारी चीन आणि पाकिस्तानसह अनेक देशांच्या संपर्कात आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेने मंगळवारी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. याआधी श्रीलंका सरकार आणि अधिकाऱ्यांनी स्थानिक मुस्लिम कट्टरतावादी तौहित जमात या संघटनेने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली होती.

- Advertisement -

हल्लेखोरांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु

भारतातील गुप्तचर अधिकाऱ्यांनी रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या दोन तास आधी श्रीलंकेला माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी सांगितले होते की, श्रीलंकेतील चर्चला दहशतवादी लक्ष्य करणार आहेत. विक्रमसिंघे यांनी सांगितले की, हल्ल्यामध्ये स्थानिक कट्टरतावादी संगठनेचा हात आहे. मात्र हल्ला घडवून आणण्यासाठी विदेशी दहशतवादी संघटनेची मदत घेण्यात आली आहे. या हल्लेखोरांपर्यंत पोहचण्यासाठी इतर देशांची मदत घेतली जात आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारत सांगितले की, श्रीलंकामध्ये आत्मघाती हल्ला करणारे लोकं इस्लामिक देशातील होती. मात्र अद्याप, आयसीसने या हल्ल्यात सहभागी असल्याचा कोणताही पुरावा दिला नाही.

भारत, अमेरिका आणि ब्रिटन करत आहे मदत

विक्रिमसंघे यांनी सांगितले की, श्रीलंका आणि भारतामध्ये गुप्तचर माहिती एकमेकांना सांगण्याची एक व्यवस्था आहे. भारत आणची सर्वप्रकारे मतद करत आहे. त्याव्यतिरिक्त अमेरिका आणि ब्रिटन देखील आमची मदत करत आहे. आमचे पहिले उदिष्ट म्हणजे हल्लेखोरांना अटक करणे. त्यांनी अशी देखील शक्यता वर्तवली आहे की, न्यूझिलंडच्या मशिदीवर केलेल्या हल्ल्याचा हा बदला असू शकतो. श्रीलंकेमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. काही लोकं अफवा पसरवत आहेत. आम्हाला विश्वास आहे की, आमचे पर्यटन क्षेत्र लवकर या हल्ल्यातून बाहेर यावे. आम्ही याआधी देखील अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -