घरCORONA UPDATEसशस्त्र सीमा बलातील अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

सशस्त्र सीमा बलातील अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

Subscribe

आतापर्यंत ९ जवानांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसागणीक वाढत आहेत. देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सशस्त्र सीमा बल (SSB) च्या ५५ वर्षीय अधिकाऱ्याचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. सशस्त्र सीमा बलातील जवानाचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे. मृत जवान हे हेड कॉन्स्टेबल रँकचे अधिकारी असून ते दिल्लीतील २५ व्या बटालियनमध्ये तैनात होते, अशी माहिती शुक्रवारी अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की संबंधित अधिकारी यापूर्वीच मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते आणि गुरुवारी संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला. नेपाळ आणि भूतानला लागून असलेल्या भारतीय सीमेच्या संरक्षणात तैनात केलेल्या सैन्यातील हा पहिलाच कोरोनाने मृत्यू आहे. सैन्यात एकूण ८०,००० जवान आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरातमध्ये काँग्रेसला घरघर, राज्यसभा निवडणुकीपूर्वी ८ आमदारांचा राजीनामा


केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात किंवा निमलष्करी दलामध्ये संक्रमणामुळे मृत्यूची ही नववी घटना आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील चार सैनिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शिवाय, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) च्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -