सुप्रीम कोर्टात महात्मा गांधीच्या फोटो ऐवजी हरिश साळवे यांचा फोटो लावा – कुणाल कामरा

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अंतरीम जामीन मंजूर केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामराने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारे उपहासात्मक ट्विट केले होते. त्यानंतर Attorney जनरल यांच्याकडे पुण्यातील काही वकिलांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर Attorney जनरल के. के. वेणूगोपाल यांनी कुणाल कामरावर अवमान खटला (Contempt of Court) दाखल करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतरही कुणाल कामरा याने न घाबरता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे. आदीच्या ट्विटमध्ये कुणालने सुप्रीम कोर्टातील महात्मा गांधी यांचा फोटो काढून तिथे हरिश साळवे यांचा फोटो लावावा अशी मागणी केली होती. आता जवाहरलाल नेहरू यांच्याजागी महेश जेठमलानी यांचा फोटो लावण्याची मागणी त्याने केली आहे.