घरदेश-विदेशAyodhya Ram Mandir : अयोध्या भूमिपूजनातील आमंत्रितांना मिळणार ही खास भेटवस्तू

Ayodhya Ram Mandir : अयोध्या भूमिपूजनातील आमंत्रितांना मिळणार ही खास भेटवस्तू

Subscribe

अयोध्येत राम जन्मभूमीच्या भूमिपूजन सोहळ्याला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत अयोध्येत हा सोहळा परा पडत आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून खास भेटवस्तू देण्यात येणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या आमंत्रितांना चांदीचे नाणे देण्यात येणार आहे. या चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचे छायाचित्र असेल. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिर ट्रस्टचे चिन्ह असणार आहे. केवळ १७५ जणांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे.

- Advertisement -

तसेच चांदीच्या नाण्यांव्यतिरिक्त कार्यक्रमासाठी येणाऱ्या आमंत्रितांना एका बंद बॉक्समध्ये लाडूही देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाची भव्यता लक्षात घेत तब्बल १ लाख २५ हजार लाडूंचे वितरण केले जाणार आहे. यांना रघुपती लाडू म्हणूनही ओळखले जाते. हे रघुपती लाडू आमंत्रितांशिवाय अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या भाविकांनाही दिले जाणार आहेत.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी सहभागी झाले आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी देशातील १३५ साधू-संतांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Ayodhya Ram Mandir Model: असं असणार अयोध्येतील भव्य ऐतिहासिक राम मंदिर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -