घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

जम्मू काश्मीरमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Subscribe

देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. पुन्हा एकदा देश हादरवून टाकणारी घटना जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये घडली आहे. येथे एका ९ वर्षाच्या मुलीवर ४ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला असल्याने खळबळ उडाली आहे. दुःखद बाब म्हणजे या चिमुरड्या मुलीच्या सावत्र आईनेच हा बलात्कार घडवून आणला आहे. या कुकर्मी आईने माय-लेकीच्या नात्याला काळीमा फासला आहे. बलात्कारानंतर पीडित मुलीची हत्या करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी काश्मीरमधील बारामुल्ला येथे ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्याची पूनरावृत्ती समाजकंटकांनी केली आहे. या कटामध्ये पीडित मुलीच्या सावत्र आईसह सावत्र भाऊदेखील सामील होता. त्यानेदेखील त्याच्या बहिणीवर बलात्कार केला आहे. सावत्र भावासाह अजून तीन नराधम या बलात्कारामध्ये सामील होते. पीडितेची हत्या केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले, तसेच तिचे डोळे बाहेर काढले होते. तिच्या मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी तिच्या अंगावर अँसिड ओतून तिचा मृतदेह जंगलामध्ये फेकून देण्यात आला.

पीडित मुलगी २३ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती. २ सप्टेंबरला तिचा मृतदेह श्रीनगरमधील जंगलात सापडला. या गुन्ह्याप्रकरणी पीडितेची सावत्र आई, सावत्र भाऊ व या कटात सामील अजून तिघांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या दोन पत्नी आहेत. त्यापैकी एक झारखंड तर दुसरी पत्नी काश्मीरमधील आहे. झारखंडमधील पत्नीची मुलगी काश्मीरमध्ये राहत होती, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिक्षकांनी दिली.

- Advertisement -

लाड व्हायचे म्हणून केली हत्या

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेनं पोलिसांमसोर चौकशीदरम्यान सांगितले की, तिचा पती दुसऱ्या (झारखंडमधील पत्नी) पत्नीसोबत अधिक वेळ घालवत होता. तसेच तिचा पती दोन्ही पत्नींच्या सर्व मुलांमध्ये याच मुलीचे सर्वाधिक लाड करत होता, तसेच आरोपी महिला तिच्या सवतीचा तिरस्कार करत होती. त्यामुळेच तिरस्काराच्या भावनेतून सावत्र आईने हा बलात्कार आणि हत्या घडवून आणली.

- Advertisement -

घटना काय

आरोपी महिला २३ ऑगस्ट रोजी तिच्या ९ वर्षाच्या सावत्र मुलीला घेऊन जंगलात गेली. जाताना तिने सोबत चाकूदेखील घेतला होता. त्यानंतर तिचा सावत्र मुलगा तेथे आला. त्याने व त्याच्या तीन साथीदारांनी ९ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपी महिलेने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करायला लावला. सावत्र भाऊ व इतर तीन जणांनी त्या मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी घटनास्थळारून चाकू आणि कुऱ्हाड ताब्यात घेतली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -