दिवाळीपूर्वीच शेअर बाजारात आतषबाजी; सेन्सेक्स आणि निफ्टी सर्वोच्च स्तरावर

stock market

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स ६०० अंकांनी वधारला असून ४२,५०० पेक्षा जास्त अंकांसह तिहासिक उच्चांकाजवळ पोहोचला. तर निफ्टी देखील १७० अंकांनी वाढून १२४५० वर पोहचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बाजारात सलग सहाव्या दिवशी वाढ दिसून आली आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीचा परिणाम जगभरातील बाजारांवर दिसून येत आहे. आजच्या व्यवसायात अष्टपैलू खरेदी आहे. बँक आणि वित्तीय समभागांमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. आयटी निर्देशांकातही बळकटी आहे. ब्रॉड मार्केटमध्येही तेजी आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स वाढले आहेत. दरम्यान, आजच्या व्यवसायात मोठ्या समभागात मोठी रॅली पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स ३० चे सर्व ३० समभागांमध्ये तेजी आहे. आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, एचयूएल, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, भारती एअरटेल आणि एशियन पेंट्स आज अव्वल स्थानी आहेत.