Ayodhya Verdict: ‘देवाचे आभार मानतो की, या जनआंदोलनाचा एक भाग होतो’

Mumbai

गेल्या कित्येक वर्षांपासून अयोध्येमधल्या वादग्रस्त जमिनीचा मुद्दा प्रलंबित होता. या अयोध्येतील वादग्रस्त प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला. हा आनंद आणि समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. तसेच हा माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण आहे. कारण ईश्वराने मला या स्वातंत्र्यलढ्यानंतरच्या सर्वात मोठ्या जनआंदोलनात सहभागी होऊन नम्रपणे योगदान देण्याची संधी दिली त्या देवाचे मी आभार मानतो. परिणामी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शक्य झाला.’

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here