घरदेश-विदेशबायकोची हत्या करून मृतदेह खाटेखाली ठेवला; वर नवरा झोपून राहिला

बायकोची हत्या करून मृतदेह खाटेखाली ठेवला; वर नवरा झोपून राहिला

Subscribe

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्या एका माणसाने चक्क पत्नीच्या मृतदेहासोबत दोन दिवस घालवले आहेत. हा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. या व्यक्तीने पत्नीही हत्या करून तिचा मृतदेह खाटेखाली ठेवून दिला. त्यानंतर तो दोन दिवस त्या खाटेवर झोपून राहिला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला सोमवारी अटक केली आहे.

काय आहे घटना 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती अहिरवार या ३२ वर्षीय महिलेचा हा मृतदेह आहे. पती शेर सिंह अहिरवार यांच्यासह सागर जिल्ह्यातील मोतीनगर पोलीस ठाण्यात येणाऱ्या भगत सिंह वॉर्डमध्ये ती राहत होती. मोतीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख सीतश सिंह म्हणाले की, शेर सिंहच्या काही शेजाऱ्यांनी सांगितले की, त्याने त्यांच्याकडून कुऱ्हाड घेतली होती. तो सतत मारण्याची भाषा करत होता. त्यानंतर पोलीस सोमवारी शेर सिहंच्या घरी दाखल झाले. तिथे मृतदेहाची दुर्गंधी सुटली होती. तपास केला असता खाटेखाली पत्नीचा मृतदेह आढळून आला. शेर सिंहला दारूचे व्यसन होते. तो त्या पत्नीला मारहाणदेखील करत. त्याला कंटाळून पत्नी त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी राहू लागली. गेल्या आठवड्यातच ती मुलाला आपल्या आई-वडिलांकडे सोडून घरी परतली होती. आरोपी शेर सिंहने आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्यावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

अमेरिकेचा WHOसोबत काडीमोड, जमा केली कागदपत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -