घरCORONA UPDATEअजब...! उष्माघातामुळे वटवाघूळांचा मृत्यू; गावात भीतीचे वातावरण

अजब…! उष्माघातामुळे वटवाघूळांचा मृत्यू; गावात भीतीचे वातावरण

Subscribe

मध्य प्रदेशातील बैतूलच्या भीमपूर ब्लॉकमध्ये कोरोना संसर्गाला जबाबदार समजल्या जाणार्‍या वटवाघूळांचा नाश झाला.

संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या साथीच्या सावटाखाली आले आहे, कोरोनाला कारणीभूत वटवाघूळांना मानले जाते. परंतु, मध्यप्रदेशातील खेड्यात अचानकपणे वटवाघूळांच्या मृत्यूमुळे लोक घाबरून गेले आहेत. मध्य प्रदेशातील बैतूलच्या भीमपूर ब्लॉकमध्ये कोरोना संसर्गाला जबाबदार समजल्या जाणार्‍या वटवाघूळांचा नाश झाला. डझनभर वटवाघळांच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तथापी, पशुवैद्यकने सुरुवातीला उष्णतेनेमुळे वटवाघळांच्या मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला होता.

बैतूल जिल्ह्यातील बेहडा ढाना भागात, निलगिरीच्या झाडावर टांगलेली डझनभर वटवाघूळ मरणानंतर झाडांच्या खाली विखुरलेल्या स्थितीत आहेत, तर बरेच मृत अवस्थेत झाडांवर टांगलेले आहेत. गेल्या चार दिवसांपासून ही मालिका सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आज पहाटे बेहडा ढानामध्ये त्याच ठिकाणी वटवाघूळ पडल्याच्या बातमीमुळे परिसरात दहशत पसरली. या घटनेचा गाववाले कोरोनाशी संबंध जोडत आहेत.

- Advertisement -

वटवाघळांच्या मृत्यूनंतर पंचायतीने वन व पशुवैद्यकीय विभागाला कळविले. पशुवैद्यकीय पथकाने तपासणीसाठी राज्य प्रयोगशाळा भोपाळ येथे वटवाघूळांचे शवविच्छेदन नमुने गोळा करून पाठविले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितले की, जास्त उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झाला आहे. मृतावस्थेत आढळलेल्या वट वाघूळांचे मृतदेह पूर्णपणे डी-हायड्रेड झाले होते. तीव्र उष्णता आणि पाण्याअभावी हे मृत्यूमुखी झाल्याची शक्यता आहे.

पशुवैद्य डॉ. अरुणा म्हणतात की, अशी माहिती मिळाली होती की, वटवाघूळांचा मृत्यू होत आहे. त्याचे शवविच्छेदन घटनास्थळावर करण्यात आले असून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. असे दिसते की, उष्णतेमुळे वटवाघूळ मरत आहेत. तपासणी अहवालानंतर योग्य माहिती समोर येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -