घरदेश-विदेशतुमच्या मनातली आग माझ्याही मनात

तुमच्या मनातली आग माझ्याही मनात

Subscribe

तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात किती आग लागली आहे त्याचा अनुभव मला येत आहे. जी आग तुमच्या मनात लागली आहे, तशीच ती माझ्या मनातही आहे, असे जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पुन्हा एकदा ठासून सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बिहार दौर्‍यावर होते. तेथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन केल्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी मोदींनी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारमधील जवानांना श्रद्धांजली वाहिली.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले पाटणा येथील जवान संजयकुमार सिन्हा आणि भागलपूर येथील जवान रतनकुमार ठाकूर यांना मी आदरांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबाप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. पुलवामा येथील हल्ल्यानंतर तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात किती आग लागली आहे त्याचा अनुभव मला येत आहे. जी आग तुमच्या मनात लागली आहे, तशीच ती माझ्या मनातही आहे, असे पंतप्रधान म्हणाले.आज बिहार दौर्‍यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा येथील शहरी विभागात 3 हजार 200 चौ.कि.मी. परिसरातील 9.75 लाख कुटुंबांना पीएनजी आणि वाहनांना सीएनजी पुरवणार्‍या प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच सुलतानगंज आणि नवगछिया येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -