शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्ली येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Delhi
आत्महत्या

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीमध्ये घडली आहे. डेजी राठौर (१२) असे या विद्यार्थींनीचे नाव आहे. या विद्यार्थीनीने शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत असल्याचे तिने एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते. तसेच गळफास घेताना या विद्यार्थीनीने आपल्या हातावर आरोपी शिक्षकाचे नाव देखील लिहीले होते.

नेमके काय घडले?

नवी दिल्ली येथील इंदरपुर या ठिकाणी एका शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थीनीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहीली होती. त्यात तिने म्हटलं होते की, मला विज्ञानाचे शिक्षक त्रास देत असून ते सतत मला मारहाण करतात. तसेच वर्गात शिकवताना घालून पाडून बोलण्यामुळे मी त्रासले होते. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहे. असे या चिठ्ठीमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थींनीने लिहिले होते. गुरुवारी घरी कोणी नसल्याचे पाहून या चिमुरडीने आत्महत्या केली. तसेच या विद्यार्थीनीने हाताच्या तळहातावर शिक्षकाचे नाव देखील लिहीले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नवी दिल्ली पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – मुलासमोर बापाने आईची हत्या करुन केली आत्महत्या