घरदेश-विदेशब्राह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

ब्राह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

Subscribe

ब्राह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ब्राह्मोसमुळे लांब अंतरावर असलेले लक्ष्य भेदण्याची क्षमता भारतीय नौदलाला प्राप्त झाली आहे.

भारतीय नौदलाने रविवारी ब्राह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. ही चाचणी चेन्नई येथील स्वदेशी बनावटीच्या स्टील्थ विध्वंसक आयएनएस चेन्नईवर करण्यात आली. चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ब्राह्मोसमुळे लांब अंतरावर असलेले लक्ष्य भेदण्याची क्षमता भारतीय नौदलाला प्राप्त झाली आहे.

ब्राह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा २.८ टक्के अधिक आहे. त्यामुळे ध्वनीच्या वेगाच्या दुपटीच्या वेगाने ब्राह्मोस आपले लक्ष भेदू शकते. बाह्मोस क्षेपणास्त्राची लांबी ८.४ मीटर असून, रुंदी ०.६ मीटर आहे. तर ३००० किलोग्रॅम इतके वजन आहे. ३०० किलो वजनापर्यंत स्फोटके वाहून नेण्याची ब्राह्मोस क्षमता असून, ३०० ते ५०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदता येणार आहे. डीआरडीओ आणि रशियाच्या शास्त्रज्ञांनी हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. यापूर्वी रशिया आणि भारतीय संशोधकांनी जमीनीवरून जमीनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित केले होते. ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे जमीन, हवा आणि पाण्यावरून मारा करता येणारे क्षेपणास्त्र आहे. यामध्ये प्रोप्लेट बूस्टर आणि प्रोप्लेट रेमजेम सिस्टम आहे. ब्राह्मोसची पहिली चाचणी १२ जून २००१ मध्ये आयटीआर चांदीपूर येथे करण्यात आली होती.

- Advertisement -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या यशस्वी चाचणी झाल्यानंतर डीआरडीओ, ब्राह्मोस आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले. ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. असे सांगत ‘डीडीआर अ‍ॅण्ड डी’चे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष सथीश रेड्डी यांनी डीआरडीओ, ब्राह्मोस आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -