घरदेश-विदेशहायपरसॉनिक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी भारताचे संरक्षण क्षेत्रात यश

हायपरसॉनिक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी भारताचे संरक्षण क्षेत्रात यश

Subscribe

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) संपूर्ण भारतीय बनावटीचे ध्वनीच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने मार करणारे (हायपर सॉनिक) क्षेपणास्त्र तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित केले आहे. या तंत्रज्ञानावर आधारीत क्षेपणास्त्राची चाचणी सोमवारी ओडिशाच्या बालासोरमध्ये घेण्यात आली. हायपर सॉनिक डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल HSTDV टेस्ट नावाने ओळखल्या जाणार्‍या या यशस्वी चाचणीमुळे स्वत:चे हायपर सॉनिक तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.

हे क्षेपणास्त्र असून हवेत आवाजाच्या ६ पट वेगाने अंतर कापते. त्यामुळे शत्रुच्या एअर डिफेन्स सिस्टिमला या क्षेपणास्त्राचा मागमूसही लागणार नाही. भारताकडे आता हायपर सॉनिक मिसाईल विकसित करण्याची क्षमता आलेली आहे. डीआरडीओ पुढील पाच वर्षांत स्क्रॅमजेट इंजिनासह हे मिसाईल तयार करू शकणार आहे. हे क्षेपणास्त्र सेकंदात दोन किलोमीटर इतके अंतर कापते. हे तंत्रज्ञान युद्ध आणि अंतराळात उपग्रह पाठविण्यासाठी देखील वापरण्यात येणार आहे. त्यामुळे अंतराळात वेगाने आणि कमी खर्चात उपग्रह पाठविता येणार आहेत. याशिवाय भारताचे ब्राम्होस-२ हे क्षेपणास्त्र बनविण्यासही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

- Advertisement -

सध्या डीआरडीओ आणि रशियाची एजन्सी हे ब्राह्मोस-२ बनवित आहेत. या क्षेपणास्त्राचा वेग एवढा असतो की, जर ते भारतातून डागण्यात आले तर जगातील कोणत्याही देशाला तासाभरात उद्ध्वस्त करू शकते. सर्वसामान्य क्षेपणास्त्र हे पृथ्वीच्या कक्षेतून मारा करतात. त्यामुळे त्यांना शोधून ते हवेतच नष्ट करता येते. तर हायपर सॉनिक क्षेपणास्त्र हे पृथ्वीच्या कक्षेबाहेरून कोणत्याही ठरवून दिलेल्या मार्गाने जात नाही. ते अमेरिकेच्या दिशेने जाऊन थेट चीनवरही आदळू शकते. या क्षेपणास्त्राच्या प्रचंड वेगामुळे एअर डिफेन्स सिस्टिमही अपयशी ठरते.

हायपर सॉनिक क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा (1235 किमी प्रति तास) कमीत कमी ५ पट जास्त वेगाने मारा करू शकते. म्हणजेच 6174 प्रति तास इतका जबरदस्त वेग. या मिसाईलमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल या दोन्हींचे गुण आहेत. हे मिसाईल लाँच झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणार आहे. त्यानंतर तेथून अंतर कापत लक्ष्याकडे झेपावणार आहे. यामुळे या मिसाईलला रोखणे कठीण असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -