सुनंदा पुष्कर हत्या प्रकरण : स्वामींच्या याचिकेवरील निर्णय लांबणीवर

सुनंदा पुष्कर हत्ये प्रकरणी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने सुनावणीत भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.

Mumbai
Subramanian-Swamy
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी

सुनंदा पुष्कर हत्ये प्रकरणी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने आज, गुरुवारी झालेल्या सुनावणीत भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. या याचिकेवर १० डिसेंबर रोजी निर्णय देण्यात येईल, असे कोर्टाने म्हटले आहे. या याचिकेनुसार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टासमोर पोलिसांच्या विजिलेंच तपासाचा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. याला काँग्रेस नेता शशि थरूर यांचे वकिल विकास पाहवा यांनी विरोध दर्शवला होता.

दिल्ली पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप

आता या याचिकेवर १० डिसेंबरला सुनावणी होणार असून यापूर्वी ही सुनावणी १ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र एका बाजूचे वकील कोर्टात हजर राहू न शकल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी या हत्ये प्रकरणी दिल्ली पोलिसांवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप लावला आहे. याचा उल्लेख पोलिसांच्या तपास अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे हा अहवाल कोर्टात मागवण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.