घरदेश-विदेशशशी थरूर यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

शशी थरूर यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

Subscribe

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शशी थरूर यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. मात्र एसआयटीने शरूर यांना जामीन देण्यास विरोध केला आहे.

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमने शशी थरूर यांना जामीन देण्यास विरोध केला आहे. शशी शरूर यांची पत्नी सुनंदा पुष्करचा दिल्लीतील हॉटेल लिलामध्ये जानेवारी २०१४मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी शशी थरूर यांच्यावर संशयाची सुई आहे. या प्रकरणामध्ये आपला काहीही दोष नसल्याचे शशी थरूर यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिल्ली कोर्ट शशी थरूर यांच्या जामीन अर्जावर नेमका काय निकाल देते याकडे लक्ष लागून राहिले आहे. सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी मृत्यू झाला होता. जानेवारी २०१४ साली दिल्ली विमानतळावर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. या भांडणानंतर सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे संशयाची सुई शशी थरूर यांच्यावरती आहे.

शशी थरूर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

शशी थरूर यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. दिल्ली पोलिसांनी शशी थरूर यांच्याविरोधात ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांचा नोकर नारायण सिंग हा या केसमधील एकमेव साक्षीदार आहे. आरोपपत्र दाखल करताना दिल्ली पोलिसांनी शशी थरूर यांच्याविरोधात योग्य ते पुरावे असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

काय आहे सुनंदा पुष्कर प्रकरण

सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील लीला हॉटेलच्या बाथरूममध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्रिवेदम ते दिल्ली विमान प्रवासात सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्यात भांडण झाले होते. तसेच दिल्ली विमानतळावर देखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणानंतर सुनंदा पुष्कर यांनी स्व:ताला हॉटेलच्या बाथरूममध्ये ४५ मिनिटे कोंडून घेतले होते. विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी शशी थरूर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अद्याप तरी शशी थरूर यांना अटक झाली नसून त्यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -