घरदेश-विदेशकर्नाटकातील 'ते' आमदार अपात्रच - सुप्रीम कोर्ट

कर्नाटकातील ‘ते’ आमदार अपात्रच – सुप्रीम कोर्ट

Subscribe

विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच एकमताने १७ आमदारांनी राजीनामा देणे अपात्र असल्याचे सभापतींनी म्हटले होते. त्यामुळे या आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दलाच्या १७ आमदारांनी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन कर्नाटकाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला होता. या आमदारांना विधानसभेच्या सभापतींनी अपात्र ठरवले होते. विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच एकमताने १७ आमदारांनी राजीनामा देणे अपात्र असल्याचे सभापतींनी म्हटले होते. त्यामुळे या आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत कर्नाटकाच्या त्या १७ आमदारांना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्या १७ आमदारांना अपात्रच ठरवले आहे.


हेही वाचा – #Live: राष्ट्रवादी आमदारांची शरद पवारांच्या नेतृत्वात महत्त्वाची बैठक

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वी कर्नाटकातील राजकारणात मोठा भूकंप आला होता. सत्तेतील काँग्रेस आणि जनता दलाच्या १७ आमदारांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर प्रचंड जगद गतीने आणि वेगवेगळ्या नाट्यमय राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या होत्या. कर्नाटकातील काँग्रेस आमदार सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आयआयटी पवई येथील एका हॉटेलमध्ये राहिली होती. आमदारांच्या या राजीनाम्यामुळे कुमारस्वामी सरकारमध्ये फार मोठी खिंड पडली होती. त्यावेळी काँग्रेसच्या आणि जनता दलाच्या बड्या नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना भेटण्याचा बराच प्रयत्न केला होता. मात्र, सर्व आमदार मुंबईत आली होती. त्यातील काही आमदार दिल्लीतही गेले होते. याचाच फायदा भाजपने घेतला. भाजपने विधीमंडळात कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले. मात्र, आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अखेर एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. दरम्यान, विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभेच्या सभापतींनी या सतराही आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे त्यांनी या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीत १७ आमदार अपात्र असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.

आता १७ जागांवर पोटनिवडणूक होणार

कर्नाटकातील १७ आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर आता राज्यातील १७ विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक ५ डिसेंबर रोजी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -