घरदेश-विदेशCBI vs CBI : आलोक वर्मांची चौकशी दोन आठवड्यात पुर्ण करा -...

CBI vs CBI : आलोक वर्मांची चौकशी दोन आठवड्यात पुर्ण करा – सुप्रीम कोर्ट

Subscribe

CBI चे संचालक आलोक वर्मा यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायाशीश एस. के. कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. निवृत्त न्यायाधीस ए. के. पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार आहे. आलोक वर्मा यांनी कोर्टात सांगितले की, सीबीआयच्या संचालकांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. सरकारने त्यांना पदापासून दूर करुन सीबीआय संस्थेच्या सौर्वभौमत्वावर घाला घातला आहे. आलोक वर्मा यांच्यावतीने नरीमन युक्तीवाद करत आहेत. तर सीव्हीसीकडून तुषार मेहता बाजू मांडणार आहेत. केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल युक्तीवाद करणार आहेत.

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू होता. हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करत या दोन्ही अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेतले. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत एम. नागेश्वर राव यांची हंगामी संचालक म्हणून नियुक्ती केली. या निर्णयाविरोधात वर्मा यांनी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

तसेच सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. नागेश्वर फक्त प्रशासकीय प्रमुख असतील असे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे राव यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी जे जे निर्णय घेतले आहेत ते सर्व कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी येत्या १२ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. निवृत्त न्यायाधीश ए.के.पटनायक यांच्या देखरेखीखाली केंद्रीय दक्षता आयोगाकडून (सीव्हीसी) आलोक वर्मा यांची चौकशी सुरु राहील. देशाच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत महत्वाचे असल्याने विलंब होऊन चालणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -