घरदेश-विदेशसुप्रीम कोर्टाने राफेलविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळली

सुप्रीम कोर्टाने राफेलविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळली

Subscribe

राफेल प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागताच त्यांची माफीदेखील कोर्टाने मान्य केली आहे.

राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नाही, असे मत मांडून सुप्रीम कोर्टाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. तसेच राफेल प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागताच त्यांची माफीदेखील कोर्टाने मान्य केली आहे.

फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी प्रकरणी गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरुन दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला निर्दोष ठरवले. पण सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टात आज गुरूवारी ही सुनावणी पार पडली. कोर्टाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. दरम्यान, राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. तसंच राहुल गांधी यांचं पंतप्रधानांविरोधात केलेली चौकीदार चोर हे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण होतं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

- Advertisement -

सर्व फेरविचार याचिका फेटाळल्या

फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सदोष होती. एवढेच नाही तर पूर्वीच्या करारापेक्षा आताच्या करारातच जास्त पैसा खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. १४ डिसेंबर २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने राफेल विमानांच्या ५८ हजार कोटी रुपयांच्या करारातील गैर प्रकारांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. त्यावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी व वकील-कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी निकालावर फेरविचार करण्याची मागणी एका याचिकेतून केली होती. याशिवाय वकील विनीत धंधा, आपचे वकील संजय सिंह यांनीही फेरविचार याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -