घरदेश-विदेशसावरकर होते ब्रिटिशांचे एजंट; माजी न्यायाधीशांचे खळबळजनक वक्तव्य

सावरकर होते ब्रिटिशांचे एजंट; माजी न्यायाधीशांचे खळबळजनक वक्तव्य

Subscribe

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. आज, २८ मे रोजी वीर सावरकरांनी जयंती असून त्या निमित्ताने काटजू यांनी हे वक्तव्य केले. सावरकर हे ब्रिटिशांचे एजंट होते. मुस्लिमांविरोधात ते गरळ ओकत असत, असे काटजू यांनी म्हटले आहे. काटजू यांनी ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, काही जण सावरकर यांची स्तुती करत आहेत. मात्र माझ्या मते ते एक ब्रिटिश एजंट होते. ज्यांनी मुस्लिमांच्या विरोधात विष पसरवण्याचे काम केले. तसेच ब्रिटिशांच्या विभागणी करा आणि राज्य करा या नितीचा अवलंब केला. ट्विटसोबत त्यांनी त्यांच्या ब्लॉगची लिंकदेखील शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे याची कारण दिलेली आहेत.

हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना घरी आणण्यासाठी ‘त्याने’ पूर्ण विमान भाड्याने घेतले!

- Advertisement -

काय आहे काटजू यांच्या ब्लॉगमध्ये

कित्येक जण सावरकरांना एका महान स्वातंत्र्यवीर समजतात. मात्र त्यांची खरी ओळख काय होती. खरतर ते ब्रिटिश काळात इंग्रजांनी अनेक राष्ट्रभक्तांना अटक करून शिक्षा दिली होती. तुरुंगात ते त्यांना इंग्रजांमध्ये सामील होण्यासाठी सांगत असे. यादरम्यान, सावरकरांनीदेखील इतर कैद्यासह ब्रिटिशांशी हातमिळवणी केली होती, असा आरोप काटजू यांनी लगावला आहे. सावरकर हे १९१० सालापर्यंतच राष्ट्रवादी होते. त्यांना जेव्हा अटक झाली त्यानंतर त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -