‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून अवमान नोटीस

चौकीदार चोर है' हे न्यायालयानंही मान्य केले आहे, असे वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली आहे.

Delhi
Rahul gandhi hits out at sam pitroda for remarks on 1984 riots saying pitroda should be ashamed
राहुल गांधी

चौकीदार चोर है‘ हे न्यायालयानंही मान्य केले आहे, असे वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली आहे. त्यामुळे ‘चौकीदार चोर है’ हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भाजप नेत्या मिनाक्षी लेखी यांनी दाखल केलेली मानहानी याचिका रद्द करण्यात यावी, अशी विनंती राहुल गांधी यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने ती फेटाळून लावली. मिनाक्षी लेखींद्वारे राहुल यांच्याविरोधात दाखल मानहानी याचिका आणि राफेल प्रकरणी निकालाविरोधात दाखल फेरविचार याचिकेवर ३० एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले आहे.

वक्तव्य चुकीचे असल्याचे राहुलने केले मान्य

सुनावणी दरम्यान मीनाक्षी लेखी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात बाजू मांडली होती. तसेच आपण केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे राहुलने मान्य केले आहे. त्याचप्रमाणे कोर्टाचे आदेश न पाहता उत्साहाच्या भरात विधान केल्याचे स्पष्टीकरण राहुल गांधीने केले आहे. मात्र त्यांची दिलगिरी व्यक्त करणे हा केवळ दिखावा असल्याचे रोहतगी यांनी सांगितले आहे.

चौकीदीर कोण आहे

चौकीदार कोण आहे अशी विचारणाही कोर्टानं केली असता. त्यावर राहुल यांनी अमेठीपासून वायनाडपर्यंत कोर्टाने चौकीदार चोर असल्याचे मान्य केल्याचा प्रचार केला असून चौकीदार नरेंद्र मोदी आहेत, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. एका राष्ट्रीय पक्षाचे नेते सुप्रीम कोर्टासोबत कशा प्रकारे व्यवहार करत आहेत हे बघायला हवे, असे रोहतगी म्हणाले आहेत.

राहुल गांधी नम्र आणि प्रामाणिक

राहुल गांधी गे नम्र आणि प्रामाणिक आहेत. त्यांनी झालेल्या चुक्कीबद्दस दिलगीरी व्यक्त केली आहे आणि याचिका रद्द करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी हे चौकीदार चोर है या घोषणेवर ठाम आहेत, असे राहुल गांधींच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणीवेळी सांगितले आहे.


वाचा – राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध

वाचा – ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी मागितली माफी