घरदेश-विदेश'सरन्यायाधीशांच्या विरोधात षडयंत्र रचण्यासाठी मला दीड कोटींची ऑफर'

‘सरन्यायाधीशांच्या विरोधात षडयंत्र रचण्यासाठी मला दीड कोटींची ऑफर’

Subscribe

सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने लैगिंक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील उत्सव बैन्स यांना त्या महिलेच्या पक्षाकडून खटला लढवण्यासाठी आणि गोगाई यांच्या विरोधात षडयंत्र रचण्यासाठी दीड कोटी रुपयांची ऑफर आल्याची माहिती स्वत: बैन्स यांनी दिली आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या विरोधात षडयंत्र रचण्यासाठी मला दीड कोटी रुपयांची ऑफर आल्याची धक्कादायक माहिती सुप्रीम कोर्टाच्या एका वकीलाने दिली आहे. या वकिलाचे नाव उत्सव बैन्स असं आहे. उत्सव यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन या संदर्भात माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी रंजन गोगाई यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या माजी महिला कर्माचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाचे वकील उत्सव बैन्स यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. उत्सव यांनी याअगोदर आसाराम बापूच्या विरोधात सुप्रीम कोर्टात खटला लढवला होता.

नेमकं काय म्हणाले उत्सव बैन्स?

उत्सव बैन्स यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, ‘मला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या विरोधात षडयंत्र निर्माण करुन त्यांच्या विरोधातील लैंगिक शोषणाची केस लढवावी अशी ऑफर आली आहे. याशिवाय त्यांच्याविरोधात प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद घ्यावी, असेही सांगण्यात आलं. परंतु, जेव्हा मी ऑफर नाकारली तेव्हा समोरच्या व्यक्तीने मला मी याअगोदर लढलेल्या खटल्याचे उदाहरणं दिली.’

- Advertisement -

यापुढे बैन्स यांनी सांगितलं की, ‘आसाराम बापू केसमध्ये ज्याप्रमाणे पीडितेला तुम्ही मदत केली तशी आता सुप्रीम कोर्टाच्या माजी महिला कर्मचाऱ्याला मदत करावी, अशी विनंती समोरच्या व्यक्तीने मला केली. परंतु, मी जेव्हा त्याला विचारलं की, तुमचं आणि त्या व्यक्तीचं नातं काय? तर त्या व्यक्तीला ते व्यवस्थित सांगता आलं नाही. त्यामुळे त्याच्या बोलण्याच्या शैलीवरुन तो एक एजंट आहे, याची जाणीव मला झाली. त्याने गोगाई यांच्या विरोधात लढण्यासाठी ५० लाखांची ऑफर दिली. यासोबत त्याने सांगितलं की, प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद घेऊन मी जे सांगेल ते तुम्ही सांगा, असंही सांगितलं. परंतु, मी त्याची ही ऑफर नाकारली. त्यानंतर त्याने मला दीड कोटी रुपयांची ऑफर दिली. मी तरिही त्याची ही ऑफर नाकारली आणि त्याला ऑफीस मधून बाहेर जाण्यास सांगितलं.’

- Advertisement -

‘यासंदर्भात सरन्यायाधीश यांना माहिती देण्यासाठी आपण त्यांच्या निवासस्थानी देखील गेलो होतो. मात्र, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गोगाई घरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपली गोगाई यांच्याशी भेट झाली नाही. या संदर्भात तुम्ही माझ्या मोबाईलचं लोकेशन देखील तुम्ही ट्रेस करु शकतात’, असं उत्सव यांनी सांगितलं.

उत्सव बैन्स यांचा फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -